Home क्राईम क्लास चालक शिक्षकाने केला अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

क्लास चालक शिक्षकाने केला अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

Classroom teacher sexually assaulted a minor

Nanded Crime : नांदेड येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. एका खासगी क्लास घेणाऱ्या शिक्षकाने 12 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार (sexually assaulted) केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी संशयित शिक्षक आरोपी सतीश नरंगले यास ताब्यात घेण्यात आले आहे.

नांदेड येथील यश नगर परिसरात आइडियल इंस्टिट्यूट सायन्स आणि मॅथेमॅटिक्स नावाची खासगी क्लासेस आहे.  या क्लाससाठी अनेक विद्यार्थी येत असतात. सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास शिकवणीसाठी आलेल्या एका 12 वर्षीय विद्यार्थिनीवर संशयीत आरोपी शिक्षकाने लैंगिक अत्याचार (sexually assaulted) केले. या घटनेची माहिती पीडित मुलीने घरी आल्यावर आईला सांगितली. त्यानंतर पीडीत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन भाग्यनगर पोलिसांनी सतीश नरंगले विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा (POCSO CRIME) दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्यावर भाग्यनगर पोलिसांनी संशयित आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. डीवायएसपी चंद्रसेन देशमुख यांनी याबाबतची माहिती दिली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. या नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनेने नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Web Title: Classroom teacher sexually assaulted a minor

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here