Home संगमनेर Sangamner Municipal Council Election: संगमनेर नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग निहाय रचना

Sangamner Municipal Council Election: संगमनेर नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग निहाय रचना

Sangamner Municipal Council Election

संगमनेर | Sangamner Municipal Council Election: संगमनेर नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग निहाय रचना तयार करण्यात आली आहे. आता 30 नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. यापुर्वी 28 नगरसेवक होते. आता मात्र नव्याने दोन प्रभागांमध्ये वाढ झाली असून प्रभाग रचनेत बदल (Ward Change) झाल्याने अनेक नगरसेवकांना नवीन प्रभाग पहावा लागणार आहे.

प्रभागनिहाय लोकसंख्या आणि उपनगरे खालीलप्रमाणे:

प्रभाग 1 – या प्रभागात 4136 लोकसंख्या असून यामध्ये श्रमिक नगर, गोविंद नगर, गणेश नगर

प्रभाग 2 – या प्रभागात 4027 लोकसंख्या असून यामध्ये ऑरेंज कॉर्नर सुयोग सोसायटी, भरत नगर, स्वामी समर्थ नगर, सिद्धिविनायक सोसायटी

प्रभाग 3 – या प्रभागात 4438 लोकसंख्या असून यामध्ये मालदाड रोड, आदर्श कॉलनी, आनंदनगर, सौभाग्य मंगल कार्यालय

प्रभाग 4 – या प्रभागात 4299 लोकसंख्या असून कुरण रोड, गुंजाळ आखाडा, पानसरे आखाडा, पंचायत समिती, पाबळे वस्ती, जब्बार मळा

प्रभाग 5 – या प्रभागात 4159 लोकसंख्या असून शिवाजीनगर, पद्मनगर, स्वप्ननगरी, क्रांती चौक, आशिर्वाद पतसंस्था

प्रभाग 6 – या प्रभागात 4169 लोकसंख्या असून यामध्ये जनतानगर, चैतन्यनगर

प्रभाग 7 – या प्रभागात 4124 लोकसंख्या असून इंदिरानगर

प्रभाग 8 – या प्रभागात 4720 लोकसंख्या असून देवाचा मळा, सावता माळी नगर, एसटी स्टॅण्ड, पंजाबी कॉलनी, वकिल कॉलनी, अभंग मळा, शारदा विद्यालय

प्रभाग 9 – या प्रभागाची लोकसंख्या 4433 असून नविन नगर रोड, लिंक रोड, ताजणे मळा, नवघर गल्ली, अरगडे गल्ली

प्रभाग 10 – या प्रभागात लोकसंख्या 4128 लोकसंख्या असून भारतनगर, रेहमतनगर, अलका नगर, काठे मळा, मौलाना आझाद मंगल कार्यालय, गलांडे मळा

प्रभाग 11- या प्रभागात 4568 लोकसंख्या असून देवीगल्ली, घासबाजार, उपासणी गल्ली, तेली खुंट, लखमीपुरा

प्रभाग 12- या प्रभागाची लोकसंख्या 4549 असून या मध्ये गांधी चौक, कोष्टी गल्ली, अशोक चौक, मेन रोड, बाजार पेठ, पानसरे गल्ली, स्वामी विवेकानंद चौक, साईनाथ चौक, वडगल्ली, भागवत वाडा, कुंभार आळा

प्रभाग 13 – या प्रभागाची लोकसंख्या 4904 असून त्यामध्ये घोडेकर मळा, साईनगर, पंपिंग स्टेशन, चव्हाण पुरा, जेधे कॉलनी, माधव थिएटर समोरील वसाहत, स्वामी समर्थ मंदिर

प्रभाग 14 – या प्रभागाची लोकसंख्या 4249 असून यामध्ये रंगारगल्ली, चंद्रशेखर चौक, पेटिट विद्यालय, खंडोबा गल्ली, वाडेकर गल्ली, परदेशपुरा, अ‍ॅग्लो उर्दु हायस्कुल

प्रभाग 15 – या प्रभागाची 4901 लोकसंख्या असून यामध्ये नाईकवाडपुरा, डाके मळा, जोर्वे रोड, यंग नॅशनल स्पोटर्स ग्राऊंड पुणे नाका, अमरधाम

अशा उपनगरांचा समावेश असणार आहे.

Web Title: Sangamner Municipal Council Election

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here