अहमदनगर: मुलीचा विनयभंग करणार्या आरोपीला सक्त मजुरी
Ahmednagar News: अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा.
राहुरी : तालुक्यातील ताहराबाद परिसरात सुमारे एक वर्षापूर्वी घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणी जिल्हा न्यायालयाने आरोपीला ३ वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ताहराबाद परिसरात घडलेल्या या दुर्देवि घटनेच्या बाबत न्यायालय काय निर्णय देते याकडे तालुक्याचे लक्ष वेधले होते.
राहुरी तालुक्यातील अल्पवयीन मुलगी 12 मार्च 2022 रोजी लघुशंकेसाठी स्मशानभुमीकडे गेली असता शिवा विधाते याने तिच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 354, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटल्याची सुनावणी अतिरिक्त सह.जिल्हा न्यायाधीश देशमुख यांच्या समोर झाली.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात आरोपी शिवा उत्तम विधाते (रा. ताहराबाद) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर खटला जिल्हा न्यायालयात सुरू झाला. न्यायालयाकडून साक्ष पुरावे तपासण्यात आले. दि. १२ ऑक्टोबर रोजी मा. अतिरिक्त सह सत्र न्यायाधीश पी. आर. देशुमख (पोक्सो कोर्ट) यांनी सदर घटनेत आरोपी शिवा उत्तम विधाते याला दोषी ठरविले. त्यानुसार आरोपीस ३ वर्ष सक्तमजुरी व ५ हजार रू. दंड व दंड न भरल्यास ६ महिने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली.
Web Title: Compulsory wages to the accused who molested the girl
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App