Home अहमदनगर ”मनोज जरांगे करत असलेली मागणी चुकीची”, भाजपच्या बड्या नेत्याचं विधान

”मनोज जरांगे करत असलेली मागणी चुकीची”, भाजपच्या बड्या नेत्याचं विधान

Manoj Jarange Patil: भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगेंच्या मागणीला एक प्रकारे विरोध केल्याचं दिसून येतंय.

Manoj Jarange's demand is wrong', the statement of a senior BJP leader

मुंबईः मराठा आरक्षणासाठी जालन्यातल्या आंतरवाली सराटी येथे आरक्षण मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. लाखोंच्या संख्येने मराठा समाजबांधव या मेळाव्यासाठी उपस्थित होते.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. येत्या १० दिवसांमध्ये राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, नाहीतर पुढची जबाबदारी सरकारची असेल, असा इशाराच जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मनोज जरांगे यांनी केलेली मागणी अयोग्य असल्याचं भाजपच्या मोठ्या नेत्याने म्हटलं आहे. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाहीये परंतु ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करणं योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय.

भाजप नेते राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe Patil) पाटील यांनी जरांगेंच्या मागणीला एक प्रकारे विरोध केल्याचं दिसून येतंय. विखे पाटील म्हणाले की, जरांगे यांची मागणी योग्य नाहीये. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे परंतु ओबीसी प्रवर्गातून देण्याची मागणी करणं अयोग्य आहे. ते कधी कुणबी दाखले मागत आहेत तर कधी ओबीसी आरक्षण मागत आहेत.

”मुळात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण पाहिजे, हीच आंदोलकांची मागणी होती. जरांगे पाटील मात्र वेगवेगळ्या मागण्या करीत आहेत. त्यांची भूमिका योग्य नाही” अशी स्पष्ट भूमिका राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडली आहे.

भाजप सरकारने दिलेलं आरक्षण हे महाविकास आघाडी सरकारमुळे टिकू शकलेलं नाही. जरांगे यांना आरक्षण लढ्यासाठी पाठिंबा मिळत आहे, ते चांगलं आहे. परंतु ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मागणं चूक असून मराठ्यांना कुणाच्याही आरक्षणाचा वाटा नको आहे, अशी सुरुवातीपासूनची मागणी आहे. असेही विखे पाटील यांनी बोलून दाखविले.

Web Title: Manoj Jarange’s demand is wrong’, the statement of a senior BJP leader

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here