Home अहमदनगर नाशिक विभाग पदवीधर निवडणूकीसाठी कॉंग्रेसकडून उमेदवारी जाहीर, उद्या भरणार अर्ज

नाशिक विभाग पदवीधर निवडणूकीसाठी कॉंग्रेसकडून उमेदवारी जाहीर, उद्या भरणार अर्ज

Ahmednagar News:  नाशिक विभाग पदवीधर निवडणूकीसाठी (Election) कॉंग्रेसकडून सलग चौथ्यांदा उमेदवारी जाहीर.

Congress announces candidature for Nashik division graduate election

अहमदनगर:  महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी कॉंग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ते गुरुवारी (दि. १२) आपला उमेदवारी अर्ज कॉंग्रेसचे नेते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहे.

राष्ट्रीय शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) ने यापूर्वीच त्यांना निवडणुकीसाठी उमेदवारी पुरस्कृत केली होती. डॉ. सुधीर तांबे यांना नाशिक मतदारसंघातून कॉंग्रेसतर्फे सलग चौथ्यांदा उमेदवारी मिळाली आहे.

२००९ मध्ये तत्कालीन आमदार प्रतापदादा सानवणे धुळे लोकसभा मतदारसंघात विजयी झाले होते. त्यांच्या खासदारकीमुळे रिक्त झालेल्या जागेवर अवघ्या ११ महिन्यांच्या कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीत डॉ. तांबे यांनी निवडणूक लढविली होती.

त्यावेळी काँग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार अॅड. नितीन ठाकरे, भाजपचे उमेदवार डॉ. प्रसाद हिरे यांचा हजार मतांनी त्यांनी पराभव केला होता. २०१० मधील निवडणुकीत डॉ. तांबे हे काँग्रेस आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले असता त्यांच्यासमोर भाजपकडून प्रा. सुहास फरांदे यांनी आव्हान निर्माण केले होते.

या निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे ३५ हजारांच्या विक्रमी मतांनी ते निवडून आले होते. २०१७ च्या निवडणुकीत त्याचीच पुनरावृत्ती झाली. भाजपचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील तांबे यांनी पराभव केला होता. आता कॉंग्रेसने त्यांना सलग चौथ्यांदा उमदेवारी जाहीर केली आहे.

दरम्यान विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त २ दिवस उरले आहेत. त्यातच काँग्रेसकडून विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्याचे ठरले असले तरी त्यांनी अद्याप उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. राम शिंदे म्हणाले होते ”नाशिक पदवीधरसाठी अनपेक्षित उमेदवार देखील असू शकतो”. त्यामुळे भाजप नेमकं कोणता अनपेक्षित उमेदवार जाहीर करते? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तर काँग्रेसकडून अजून देखील उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे काँग्रेसही सावध भूमीका घेत असल्याचे बोलले जात आहे.

शिंदे म्हणाले, ”नाशिक पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी जाहीर होणार आहे. मात्र, त्या उमेदवारीबाबत विचार विनिमय सुरु आहे. आमच्यासमोर अनेक नावे आहेत. त्यापैकी वेगवेगळी अनेकांची मतमतांतर आहेत. त्यामुळे उमेदवारी जाहीर करण्यामध्ये विलंब होत आहे. पाच जिल्ह्यांचा व्याप आहे, त्यामुळे ही निवडणूक जिंकण्याच्या दृष्टिकोनातून भाजपचे नेतृत्व यावर चर्चा करत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले होते.

”मात्र, तरीही आज किंवा उद्या भाजपचा नाशिक पदवीधर मतदारसंघाचा उमेदवार जाहीर होईल. त्यामध्ये आमच्याकडे राजेंद्र विखे, मीनाक्षी पाटील, धनंजय विसपुते ही नावे आहेत. तसेच यापेक्षाही वेगळे नाव येऊ शकते. नाशिक पदवीधरसाठी अनपेक्षित उमेदवारही असू शकतो” असे सूचक विधान त्यांनी केल्यामुळे मतदार संघात चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, शिंदे यांनी अनपेक्षित उमेदवारही असू शकतो, असे सांगितल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे भाजप आता अनपेक्षित उमेदवार नेमकी कोणता जाहीर करणार? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Web Title: Congress announces candidature for Nashik division graduate election

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here