Home अहमदनगर अहमदनगर: बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळून आला

अहमदनगर: बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळून आला

Ahmednagar News: बेपत्ता महिलेचा मृतदेह (Dead body) विहिरीत तरंगताना आढळून आला, महिलेने आत्महत्या (Suicide) केल्याचा प्राथमिक अंदाज.

Dead body of the missing woman was found

अहमदनगर:  सोमवारी बेपत्ता झालेल्या शहरातील महिलेचा मृतदेह कुष्ठधाम रस्त्यावरील एका विहिरीत आढळून आला. तोफखाना पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढत जिल्हा रुणालयात पाठविला. उषा राजेंद्र कानडे (वय 50, समता चौक, सिव्हील हाडको, सावेडी) असे या मयत महिलेचे नाव आहे. या महिलेने आत्महत्या (Suicide) केल्याचा प्राथमिक अंदाज असून, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

उषा कानडे या बेपत्ता झाल्याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात मिसिंगची (Missing) नोंद करण्यात आली होती. त्यांचा मुलगा अमोल राजेंद्र कानडे यांनी आई वॉकिंगला गेल्यावर घरी परतली नसल्याची तक्रार दिली होती. मंगळवारी दुपारच्या सुमारास कुष्ठधाम रस्त्यावरील एका मोकळ्या जागेत असलेल्या विहीरीत महिलेचा मृतदेह आढळून आल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक जुबेर मुजावर यांनी सहकार्‍यांसह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढल्यावर सोमवारी बेपत्ता झालेल्या उषा कानडे या महिलेचा हा मृतदेह असल्याचे समोर आले. पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Dead body of the missing woman was found

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here