Home अमरावती Accident Breaking: आमदार बच्चू कडू यांचा अपघात, जखमी

Accident Breaking: आमदार बच्चू कडू यांचा अपघात, जखमी

MLA Bacchu Kadu Accident:  रस्ता ओलांडताना दुचाकीने जोरदार धडक दिल्याने बच्चू कडू यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला जबर मार.

Bacchu Kadu Accident injured

अमरावती:  प्रहार संघटनेचे नेते, माजी मंत्री तथा आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. रस्ता ओलांडताना दुचाकीने जोरदार धडक दिल्याने बच्चू कडू यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला जबर मार लागला आहे.

आमदार बच्चू कडू हे आज पहाटे 6 ते 6.30च्या दरम्यान रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी सुस्साट वेगात आलेल्या दुचाकीने बच्चू कडू यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे बच्चू कडू जागेवरच कोसळले. त्यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला जबर मार लागला. डोक्याला मार लागल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. त्यामुळे त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डोक्याला आणि उजव्या पायाला मोठ्या प्रमाणात इजा झाल्याची माहिती आहे. बच्चू कडू यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यामुळे त्यांच्या डोक्याला चार टाके पडले आहे. त्यांच्या डोक्याला आणि पायाला बँडेज लावण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर नसून चिंतेचं काही कारण नसल्याचं सांगण्यात आलं.

Web Title: MLA Bacchu Kadu Accident injured

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here