धक्कादायक: अकोले तालुक्यात आज १९ कोरोनाबाधित
अकोले: अकोले तालुक्यात आज शनिवारी ॲन्टीजन टेस्टमध्ये १५ व खाजगी प्रयोगशाळेतील एक असे ०४ व्यक्ती कोरोना बाधित आढळून आले आहेत. तालुक्यातील एकुण रुग्ण संख्या झाली २७८ इतकी झाली आहे. शहरातील ,कारखाना रोड, सह तालुक्यातील परखतपुरधामणगाव आवारी,मनोहरपुर, कळस, हिवरगाव आंबरे, देवठाण, कोतुळ, ब्राम्हणवाडा येथील व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या आहेत.
खानापुर येथील कोविड सेंटरमध्ये १३० व्यक्तीच्या रॅपिड ॲन्टीजन कोरोना टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये १५ व्यक्ती कोरोना पॅाझिटीव्ह आलेत. यामध्ये शहरातील कारखाना रोड येथील ४२ वर्षीय, पुरुष ७१ वर्षीय पुरुष, १६ वर्षीय तरुण, १२ वर्षीय युवती, मनोहरपुर येथील ४० वर्षीय पुरुष, १३ वर्षीय तरुण, ३४ वर्षीय महीला, हिवरगाव आंबरे येथील ५१ वर्षीय पुरुष, ४६ वर्षीय महिला, ८ वर्षीय मुलगा, कळस येथील ३० वर्षीय तरुण, देवठाण येथील ८५ वर्षीय वृद्ध व कोतुळ येथील ४१ वर्षीय पुरूष, २३ वर्षीय पुरूष, ९५ वर्षीय महीला अश्या १५ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला तर खाजगी प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात धामणगाव आवारी येथील ४४ वर्षीय पुरूष, परखतपुर येथील ३९ वर्षीय पुरूष, ब्राम्हणवाडा येथील ३५ वर्षीय पुरुष व कोतुळ येथील ४० वर्षीय पुरुष अशी चार व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. एकाच दिवसात तालुक्यात आज १९ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्यातील कोरोना बाधितांची एकुण संख्या २७८ झाली आहे.
अलताफ ईस्माईल शेख संपर्क (७३८७०२०५९७) पञकार, अकोले
Web Title: Corona News Akole Taluka 19 new infected
Get See: Latest Marathi News