Coronavirus: अकोले तालुक्यात आज तब्बल १६ करोना रुग्णांची वाढ
Coronavirus |अकोले: अकोले तालुक्याची करोनाबाधितांची संख्या वाढत आहेत. मागील चार दिवसांपासून दोन आकडी संख्या आढळून येत आहे. अकोले तालुक्यात आज शासकीय प्रयोगशाळेत एक तर अॅटीजेन टेस्टनुसार १५ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. एकूण करोनाबाधितांची संख्या २७५ इतकी झाली आहे. मयत एकूण सात आहेत.
खानापूर कोविड सेंटर मधून अॅटीजेन टेस्टनुसार १५ रुग्णांचा अहवाल यामध्ये मनोहरपूर येथील १५ वर्षीय मुलगा, ४० वर्षीय पुरुष, ३४ वर्षीय महिला, हिवरगाव येथील ८ वर्षीय मुलगी, ५१ वर्षीय पुरुष, ४६ वर्षीय महिला, कळस ३० वर्षीय तरुण, कारखाना रोड येथे ४२ वर्ष पुरुष, ७१ वर्षीय पुरुष, १६ वर्षीय मुलगा, १२ वर्षीय बालिका, देवठाण येथील ८५ वर्षीय पुरुष, कोतूळ येथे ४१ वर्षीय पुरुष, २३ वर्षीय तरुण ९५ वर्षीय महिला व कोतूळ येथील शासकीय प्रयोगशाळेतील ५६ वर्षीय पुरुष अशा १६ जणांचा आहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे.
Web Title: Coronavirus Akole Taluka 16 new infected
Get See: Latest Marathi News