Coronavirus: संगमनेर तालुक्यात आज 38 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
Coronavirus | संगमनेर: संगमनेर तालुक्यात आज तब्बल 38 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या 1153 इतकी झाली आहे. आज आलेल्या खाजगी प्रयोगशाळेच्या अहवालात 9 जणांचा तर अँटीजन टेस्टच्या माध्यमातून 29 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
खाजगी प्रयोगशाळेतील अहवालानुसार आज शहरातील विजय नगर येथे 50 वर्षीय पुरुष, इंदिरानगर येथे 32 वर्षीय पुरुष, जानकी नगर येथे 51 वर्षीय महिला, अभंगमळा येथे 42 वर्षीय महिला करोनाबाधित आढळून आले आहेत. संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे 59 वर्षीय महिला, कौठे कपालेश्वर येथे 54 वर्षीय पुरुष, आश्वी बुद्रुक येथे 55 वर्षीय पुरुष, वडगाव पान येथे 34 वर्षीय इसम व वडझरी येथे 31 वर्षीय तरुण असा 9 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
तसेच आरोग्य विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या अँटीजन टेस्टच्या माध्यमातून आलेल्या अहवालानुसार शहरातील मोमीनपुरा येथे 57 वर्षीय पुरुष, भारत नगर येथे 15 वर्षीय मुलगा व 49 वर्षीय महिला, गणेशनगर येथे 75 वर्षीय वृद्ध, 16 व 21 वर्षीय तरुण, 25 वर्षीय तरुणी, इंदिरानगर येथे 53 वर्षीय महिला, घोडेकर मळा येथे 19 वर्षीय तरुणी, पावबाकी रोड येथे 52 वर्षीय पुरुष व 26 वर्षीय तरुण, मोमीनपुरा येथे 58 वर्षीय पुरुष असा ११ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचबरोबर तालुक्यातील जवळे कडलग येथे 58 वर्षीय पुरुष, वडगाव पान येथे 17 वर्षीय तरुणी, राजापूर येथे 33 वर्षीय महिला, बोटा येथे 75 वर्षीय वृद्ध, मोधळवाडी येथे 26 वर्षीय तरुणी व 3 वर्षाची बालिका, निमोण येथे 65, 36, 50 वर्षीय पुरुष, 60, 31, 42 वर्षीय महिला, 4 वर्षीय दोन व अवघ्या 3 महिन्याची बालिका, 10 वर्षाची मुलगी, ढोलेवाडी येथे 65 वर्षीय महिला असा 18 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सद्यस्थितीत 180 जणांवर उपचार सुरू आहेत.
Web Title: Coronavirus Sangamner Taluka 38 new infected
Get See: Latest Marathi News