अकोले लिंगदेव येथील करोनामुक्त, जिल्ह्यातील तीन जण करोनामुक्त
अहमदनगर: जिल्ह्यात आज तीन जण करोना मुक्त झालेले आहेत. या तीनही रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोना मुक्त रुग्णांची संख्या ७३ झाली आहे.
अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील ५६ वर्षीय व्यक्ती करोनामुक्त झाली आहे. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील २४ वर्षीय युवक बरा झाला आहे. श्रीरामपूर वडाळा महादेव येथील ३२ वर्षीय रुग्ण करोना मुक्त झाला आहे. या सर्वाना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. बूथ हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि कर्मचारी यांनी पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
करोना संक्रमित होऊ नये यासाठी लोकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. करोना बाधित व्यक्ती या पूर्णपणे बरे होत असून नागरिकांनी घाबरून जाता कामा नये फक्त नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
Website Title: Coronavirus Akole person Corona free