Home अकोले संगमनेरमध्ये आणखी एक एकूण ४७ तर अकोले एक एकूण १२

संगमनेरमध्ये आणखी एक एकूण ४७ तर अकोले एक एकूण १२

संगमनेर: संगमनेर तालुक्यात आणखी एका करोना रुग्णाची भर पडली आहे. त्याचबरोबर अकोले तालुक्यात सुद्धा एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. संगमनेरातील एकूण संख्या ४७ तर अकोलेतील १२ झाली आहे.

संगमनेर शहरातील मदिनानगर  येथील ३५ वर्षीय युवक करोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. हा मागील करोनाबधीताच्या संपर्कातील संक्रमित झाला आहे.

अकोले तालुक्यात कोतूळ येथे घाटकोपरहून एक जण घरी गावी आला होता. त्या ३२ वर्षीय युवकाला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

या दोनही तालुक्यात सलग काही दिवसांपासून रोज करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत हे चिंताजनक बनले आहे. आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याची एकूण करोनाबाधितांची संख्या १५२ झाली आहे. आज अकोलेतील लिंगदेव येथील एक करोना मुक्त झाल्याचे वृत्त हाती आल्यानंतरच काही वेळातच आणखी एकाची भर पडली आहे.  

Website Title: Coronavirus Sangamner Akole both one positive  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here