Home संगमनेर संगमनेरात मंगळापूर येथे आढळला करोनाबाधित

संगमनेरात मंगळापूर येथे आढळला करोनाबाधित

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील मंगळापूर येथे एक करोनाबाधित आढळल्याचे वृत्त काल रात्री उशिरा प्राप्त झाले. हा व्यक्ती नाशिक येथे पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. तो मागील काही दिवसांपासून आपल्या घर्री मूळ गावी मंगळापूर येथे राहत होता.

त्याला आरोग्याचा त्रास होऊ लागल्याने नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी रात्री त्याचा अहवाल नाशिक विभागाकडून उशिरा प्राप्त झाला. त्याचा तपासणी अहवाल करोना पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संगमनेर करोनाबाधितांची संख्या ४८ झाली आहे.

आता त्याच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेण्यात येणार असून तपासणीसाठी त्यांचे स्त्राव पाठविण्यात येणार आहे. संगमनेर करोनाबाधितांचा आकडा हा वाढतच चालला आहे. त्यामुळे संगमनेरकरांची चिंता वाढलेली आहे. सायंकाळी मदिनानगर येथील ३५ वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

संगमनेर तालुक्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याची तसेच नियमांचे पालन करणे गरजेचे आहे नाहीतर मालेगाव सारखी परिस्थिती होण्यास वेळ लागणार नाही.

Website Title: Coronavirus Sangamner Mangalapur corona positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here