Home संगमनेर संगमनेर तालुक्यात निंबाळे येथे करोनाबाधित आढळला

संगमनेर तालुक्यात निंबाळे येथे करोनाबाधित आढळला

संगमनेर: संगमनेरच्या ग्रामीण भागात करोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने ग्रामीण भागातील वातारण भीतीचे निर्माण झाले आहे. सुरुवातीला धांदरफळ, केळेवाडी आणि आता निंबाळे येथे करोना बाधित आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. नाशिक जिल्हा प्रशासन यंत्रणेने करोनाची लागण झाल्याचा अहवाल संगमनेर स्थानिक प्रशासनाला कळविला आहे. या वृत्ताने  संगमनेर तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संगमनेर पासून तीन किलोमीटर अंतरावर निंबाळे येथे करोनाबाधित आढळून आल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.

निंबाळे येथील ३० वर्षीय तरुणाला करोनाची लागण झाल्याचा नाशिक जिल्हा प्रशासनाचा अहवाल मिळाल्याने आरोग्य यंत्रणेची धांदर उडाली आहे. सदर रुग्ण हा आरोग्याचा त्रास जाणवू लागल्याने नाशिक रुग्णालयात दाखल झाला होता. तेथे त्याला करोनाची लक्षणे दिसून आल्याने जिल्हा रुग्णालयाने त्याची स्त्राव तपासणी केली त्यात त्याला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सदरच्या रुग्णाची माहिती जाणून घेण्यासाठी प्रशासन माहिती संकलित करत आहेत.

Website Title: coronavirus found at Nimbale in Sangamner taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here