Home संगमनेर संगमनेर: निंबाळे तरुणाचा पुणेतील अहवाल निगेटिव्ह तर नाशिकचा पॉझिटिव्ह

संगमनेर: निंबाळे तरुणाचा पुणेतील अहवाल निगेटिव्ह तर नाशिकचा पॉझिटिव्ह

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील निंबाळे येथील एक ३० वर्षीय तरुण १९ मे रोजी उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. २१ मे रोजी नाशिकच्या सामान्य रुग्णालयाने त्याचे घशातील स्त्राव घेऊन धुळे येथील वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. मात्र तो वेळेत उपलब्ध न झाल्याने सामान्य रुग्णालयाने २४ मी रोजी त्याचे स्त्राव पुणे येथील लष्करी वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविला. २५ मी रोजी हा अहवाल प्राप्त होऊन तो निगेटिव्ह आला होता. त्यामुळे नाशिकच्या सामान्य रुग्णालयाने त्याला डिस्चार्ज दिला. तो खासगी रुग्णालयात उपचार घेत होता.

आज धुळ्याच्या प्रयोगशाळेत प्रलंबित असलेला अहवाल नाशिक प्रशासनाला प्राप्त झाला. त्यात पुणे येथील अहवालात निगेटिव्ह ठरलेला अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. नाशिक जिल्हा प्रशासनाने तातडीने त्याला खासगी रुग्णालयातून जिल्हा सामान्य रुग्नालयात दाखल करून घेतले. असून आज त्याचे स्त्राव पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्या अहवालानंतरच खरी वस्तूस्थिती समोर येणार आहे. या प्रकाराने आरोग्य यंत्रणा गोंधळात पडली आहे.

सदर रुग्णाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा यंत्रणेकडून स्थानिक प्रशासनाला कळविण्यात आली. संगमनेर तालुक्यातील निंबाळे येथे राहणाऱ्या त्याच्या कुटुंबियांना होमकोरांटाइन करण्यात आले आहे. आज तिसरा अहवाल पाठविण्यात आला आहे तो प्राप्त झाल्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाणार आहे. ग्रामीण भागातही करोनाने जोर घेतल्याने तालुक्यात मात्र खळबळ उडाली आहे.  

Website Title: Latest News Nimbale youth’s report in Pune is negative

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here