Home अहमदनगर घरात वेश्या व्यवसाय, पोलिसांचा छापा, तीन महिला ताब्यात

घरात वेश्या व्यवसाय, पोलिसांचा छापा, तीन महिला ताब्यात

श्रीगोंदा: श्रीगोंदा येथील पोलिसांनी वेश्या व्यवसाय करणाऱ्या घरावर छापा टाकत तीन महिला व संजय जाधव रा. आढळगाव ता. श्रीगोंदा, अकबर बागवान छोटू शेख रा. खोसपुरी ता. नगर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई बुधवारी दुपारी करण्यात आली.  

श्रीगोंदा शहरातील एका घरात वेश्या व्यवसाय चालतो अशी माहिती पोलीस उपाधीक्षक संजय सातव व पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना मिळाली. याबाबत पोलिसांनी खात्री करून सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस हवालदार रोहिदास झुंजार, अमोल आजबे, महिला पोलीस कर्मचारी लता पुराने, छाया माने यांच्या पथकाने सदर घरात छापा टाकला त्यावेळी तेथे तीन आंबटशौकीन तेथे आढळून आले. तसेच तीन महिला आढळून आल्या. पोलीस पथकाने त्या तिघांसह मालकाला ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीगोंदा तालुक्यात या घटनेने खळबळ उडाली आहे.

Website Title: Latest News Prostitution at home police raids

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here