Coronavirus संगमनेर: घुलेवाडीत डॉक्टरच करोनाबाधित
संगमनेर: तालुक्यात घुलेवाडी परिसरात एक डॉक्टरच करोना बाधित झाल्याचे माहिती समोर आली आहे. या डॉक्टरला नाशिक येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आज दिनांक २७ मे रोजी संगमनेर प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे संगमनेरात एकच खळबळ उडाली आहे.
या डॉक्टरांनी दापूर येथील एक पेशन्ट तपासल्यामुळे रुग्णांच्या संपर्कातून या डॉक्टरलासुद्धा करोनाची लागण झाली आहे. त्यांचे हॉस्पिटल घुलेवाडी परिसरात असून ते ये-जा करीत होते.
याबाबत सविस्तर माहिती अशी, सिन्नर तालुक्यातील दापूर येथे एक डॉक्टर संगमनेर शहरालगत असणार्या घुलेवाडी येथून ये-जा करीत डॉक्टरकीची सेवा देत होते. त्यावेळी त्यांनी अनेक पेशन्ट तपासले. गेल्या काही दिवसांपुर्वी दापूर येथील अशाच एका व्यक्तीचे अंग दुखत होते. त्यावेळी डॉक्टरांना बोलविण्यात आले होते.
गेल्या दोन दिवसापुर्वी संशयीत म्हणून दापूर येथून काही व्यक्तींना तपासणीसाठी नेले होते. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्या रुग्णास कोरोनाची बाधा झालेली होती. त्याच्या तपासणीतून डॉक्टरलासुद्धा करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे, शहरात पुन्हा प्रशासनाने खबरदारीची भुमिका घेत त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा आता शोध सुरु केला आहे. संगमनेर शहरात नेहमी करोनाची बाहेरून आयात होत आहे.
Website Title: Coronavirus Sangamner doctor corona infected