Home अकोले समशेरपूर बाधीताच्या संपर्कातील महिला राजूरला फिरली, राजूर बंद

समशेरपूर बाधीताच्या संपर्कातील महिला राजूरला फिरली, राजूर बंद

राजूर: अकोले तालुक्यातील समशेरपूर येथील करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेली महिला राजूर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये गेली नंतर ती राजूरच्या बाजारपेठेत फिरल्याने खळबळ उडाली आहे. राजूर गाव खबरदारी म्हणून पाच दिवस बंद ठेवण्यात आले आहे.

समशेरपूर येथील कोरोना बाधित रुग्ण त्याच्या एका महिला नातेवाईकाच्या संपर्कात आल्याने व हि महिला राजूर येथील दवाखाना, स्वीट मार्ट, हॉटेल, बँक मध्ये गेल्याने राजूरकरांचे धाबे दणाणले असून राजूर पोलीस स्थानिक ग्रामपंचायत, महसूल विभाग यांनी तातडीने राजूरचे सर्व व्यवहार बंद करून संपर्कात आलेल्या व्यक्तींना संस्थात्मक कोरंटाईन केले आहे. तर सादर महिलेस तपासणीसाठी नगर येथे पाठविण्यात येणार आहे.

राजूर ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र विठा व ग्रामपंचायत यांनी याबाबत उपाययोजना करून पाच दिवस राजूरचे सर्व व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर राजूर गाव २८ ते १ जून पर्यंत लॉक डाऊन राहणार असल्याचे सरपंच गणपत देशमुख यांनी सांगितले आहे. राजूर ग्रामपंचायत व प्रशासन सतर्क झाले आहे. तर बाहेर गावातून आलेल्या व्यक्तीला सक्तीने संस्थात्मक कोरंटाईन करण्याचा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले.

Website Title: Coronavirus woman in contact with the Samsherpur victim turned to Rajur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here