Home संगमनेर संगमनेर तालुक्यात सोमवारी पुन्हा सात करोना रुग्ण

संगमनेर तालुक्यात सोमवारी पुन्हा सात करोना रुग्ण

Coronavirus Sangamner another seven infected

Coronavirus/संगमनेर: संगमनेर शहरात व ग्रामीण भागात सात जणांना करोनाची लागण झाली आहे. संगमनेर शहरात चार तर ग्रामीण भागात तीन जणांना करोनाची लागण झाली आहे. तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या ५९८ व पोहोचली आहे.

संगमनेर शहरातील घोडेकर मळा येथील ५९ वर्षीय पुरुष, ५७ वर्षीय महिला, रंगारगल्ली येथे ३६ वर्षीय पुरुष, कुरण रोड येथे ३१ वर्षीय तरुण करोनाबाधित आढळून आला आहे.

संगमनेर तालुक्यातील वरुडी पठार येथील २५ वर्षीय तरुण, निमज येथील १८ वर्षीय तरुणी, घारगाव येथील ३४ वर्षीय महिला करोनाबाधित आढळून आली आहे. मागील दोन तीन दिवसांच्या प्रमाणात सोमवारी करोनाबाधितांच्या आकड्याला थोडासा लगाम लागलेला दिसत आहे. त्यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Coronavirus Sangamner another seven infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here