Home राहाता बेपत्ता झालेल्या महाविद्यालयीन तरुणीचा मृतदेह आढळला

बेपत्ता झालेल्या महाविद्यालयीन तरुणीचा मृतदेह आढळला

Rahata Missing student death

राहता(Rahata): राहता तालुक्यातील प्रवरानगर परिसरातील घोरगे वस्ती येथील तरुणी रामेश्वरी शिवाजी गायकवाड ही विद्यार्थिनी घरातून न सांगता गेली होती मात्र तिचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. रामेश्वरी ही कॉलेजला शिक्षण घेत होती.

रामेश्वरी हिचे तिच्या आईशी घरगुती किरकोळ कारणावरून भांडण झाल्याने दिनांक २२ जुलै रोजी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास कोणाला काहीही न सांगता घरातून निघून गेली. तिच्या नातेवाईकानी तिचा शोध घेतला मात्र ती कोठेही सापडली नाही. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली. त्यानुसार मिसिंग केस म्हणून गुन्हा नोंदविण्यात आला.

याबाबत पोलिसांनी तपास केला असता राजेश्वरी हिचा मृतदेह आढळून आला. घोगरे यांच्या शेततळ्यात तिचा मृतदेह आढळून आला. तिचा मृतदेह शवविचेदन करण्यासाठी लोणी पीएमटी रुग्णालयात हलविण्यात आला.

तिचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात उलटसुलट चर्चा होत आहे. तिचा मृत्यू कसा झाला याचा अधिक तपास पोलीस करीत आहे.   

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Rahata Missing student death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here