Home संगमनेर Coronavirus: संगमनेर तालुक्यात करोनाचा १९ वा बळी

Coronavirus: संगमनेर तालुक्यात करोनाचा १९ वा बळी

Coronavirus Sangamner Kuran one death

Coronavirus/संगमनेर: संगमनेर तालुक्यासाठी मागील दोन दिवस हे घटक ठरले असून या दोन दिवसांत १०५ रुग्ण आढळून आले त्याचबरोबर आज एक करोनाने बळी घेतला आहे.

आज सोमवारी पहाटे तीन रुग्णांचा अहवाल प्राप्त झाला तर कुरण येथील ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील मृत्यूची संख्या १९ इतकी झाली आहे. 

संगमनेर तालुक्यात काल रविवारी एकच दिवशी ६० रुग्ण आढळून आले. रविवारी करोनानाढ बाधितांच्या आकडेवारीने उच्चांक गाठला आहे. संगमनेर तालुक्यात एकूण करोनाबाधितांची संख्या ५९१ इतकी झाली आहे. 

प्रशासन आता लॉकडाऊन करणार की नाही याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. संगमनेरसाठी आता प्रशासक नेमण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यात जास्त रुग्ण एकट्या संगमनेर मध्ये आढळून येत आहे. करोना हा संगमनेरकरांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. दररोज ३०,४०.५० या आकडेवारीने बाधित आढळून येत आहेत. 

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Coronavirus Sangamner Kuran one death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here