Home अहमदनगर Coronavirus: संगमनेर तालुक्यात आज पाच करोनाबाधित

Coronavirus: संगमनेर तालुक्यात आज पाच करोनाबाधित

संगमनेर: संगमनेर शहरात जनतानगर येथे आज सकाळी एक करोना बाधित आढळून आला होता. त्यांनतर सायंकाळी आणखी चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.  

संगमनेर कोरोनाच्या द्विशतकाकडे वाटचाल होत असून आज गुरुवारी सकाळी जनतानगरमध्ये ६३ वर्षीय पुरुष सापडला होता. त्यानंतर आज सायंकाळी ४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये शहरातील गणेशनगर येथील ३४ वर्षीय पुरुष व ५८ वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. त्याचबरोबर संगमनेर तालुक्यातील निमोण येथे ५० वर्षीय पुरुष व नांदूर खंदरमाळ येथील ६५ वर्षीय पुरुषास करोनाची लागण झाली आहे.

दरम्यान  पालकमंत्र्याच्या संगमनेर आढावा बैठकीनंतर पुन्हा चार रूग्णांची भर पडल्याने प्रशासन आता काय पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संगमनेर तालुक्यातील एकूण करोनाबाधितांचा आकडा १८५ वर पोहोचला आहे.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Coronavirus Sangamner five corona patient today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here