Home अकोले संगमनेरात सहा तर अकोले शहरात एक करोना रुग्ण आढळले

संगमनेरात सहा तर अकोले शहरात एक करोना रुग्ण आढळले

Coronavirus/संगमनेर: अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळी बारा करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात संगमनेर तालुक्यातील सहा, नगरमधील चार, अकोले एक, पारनेर एक करोनाबाधीतांचा समावेश आहे.

अकोले शहरात अजून एकही रुग्ण आढळून आला नव्हता मात्र आज अकोले शहरातील कांदा मार्केट येथे एक करोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.   

संगमनेर तालुक्यात आज सहा रुग्ण आढळून आले आहे. यात कुरण येथील दोन, पिंपरने येथील एक, साकुर येथील एक आणि शहरात हुसेननगर येथे एक आणि लाखामिपुरा येथे एक करोनाबाधीतांचा समावेश आहे. एकाच वेळी सहा रुग्ण आढळून आल्याने संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Web Title: Coronavirus Sangamner six and Akole one patient

Get the latest  Sangamner News, Akole News, Ahmednagar News, Maharashtra News from Crime, Political, Accident, Entertainment, Social News from all Cities of Maharashtra.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here