Home संगमनेर संगमनेरात आणखी चार रुग्ण तर एका महिलेचा करोनाने घेतला बळी

संगमनेरात आणखी चार रुग्ण तर एका महिलेचा करोनाने घेतला बळी

Coronavirus/संगमनेर: संगमनेर शहरात व ग्रामीण भागात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. संगमनेरमधील राजवाडा परिसरातील एका ३८ वर्षीय महिलेचा करोनाने बळी घेतला आहे.

तर आज बुधवारी चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या महिलेवर नगर येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला अशी माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली आहे.

संगमनेर करोनाबाधितांची संख्या ९७ झाली असून दहा जणांचा तालुक्यात करोनाने बळी घेतला आहे. ऑरज कॉर्नर येथे ५५ वर्षीय व्यक्तीला, नवघर गल्ली येथे एक २६ वर्षीय युवक, कोल्हेवाडी रोड येथील ४० वर्षीय व्यक्तीला, ठाणे येथून संगमनेर शहरात आलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे.

संगमनेर शहरातील राजवाडा परिसरातील ३८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तिच्या पार्थिवावर अहमदनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. तिच्या कुटुंबातील इतर व्यक्तींची तपासणी केली असता सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

Website Title: Coronavirus woman was killed by Corona in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here