Home अहमदनगर संगमनेरात ऑरज कॉर्नर, नवघर गल्ली, कोल्हेवाडी रोड येथे आढळले करोनाबाधित

संगमनेरात ऑरज कॉर्नर, नवघर गल्ली, कोल्हेवाडी रोड येथे आढळले करोनाबाधित

Coronavirus/संगमनेर: संगमनेर तालुक्यात आज तीन रुग्ण आढळून आले आहेत. रविवारी सात करोना बाधित आढळून आले होते. आज आणखी तीन जणांची भर पडली आहे.

संगमनेर शहरातील ऑरज कॉर्नर येथे ५५ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे. नवघर गल्ली येथे एक २६ वर्षीय युवक करोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. कोल्हेवाडी रोड येथील ४० वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे. रविवारी एकाचवेळी सात रुग्ण आढळून आले होते त्यानंतर आज तीन रुग्ण आढळून आल्याने संगमनेर शहरात खळबळ उडाली आहे.

तसेच आज अहमदनगर जिल्ह्यात एकूण २० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या ३२४ वर पोहोचली आहे.

Website Title: Coronavirus Sangamner taluka three new corona patient

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here