Home संगमनेर संगमनेर: झाडे तोडण्यास विरोध केल्याने शेतकऱ्यास बेदम मारहाण, सहा जणांवर गुन्हा

संगमनेर: झाडे तोडण्यास विरोध केल्याने शेतकऱ्यास बेदम मारहाण, सहा जणांवर गुन्हा

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील अकलापूर भागातील शेळकेवाडी भागात बाभळीची झाडे तोडल्याच्या कारणावरून शेतकरी व परिवारातील व्यक्तीस बेदम मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील अकलापूर भागातील शेळकेवाडी भागात शेती गटनंबर १५/१ येथील शेतकरी नवनाथ शंकर तळपे यांनी शेतातील बाभळीचे झाडे तोडू नका असे म्हणत विरोध केला असता सहा जणांनी लाकडी काठ्यानी व लाथाबुक्यांनी व शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. या मारहाणीत चार जण जखमी झाले आहेत.

नवनाथ शंकर तळपे या शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून मारहाण करणारे नबाजी शंकर तळपे, शांताराम नबाजी तळपे, अरुण नबाजी तळपे, ललिता अरुण तळपे, रंजना शांताराम तळपे सर्व रा. शेळकेवाडी अकलापूर ता. संगमनेर, रवींद्र लहानू सोनावणे रा. चाळापवाडी ता.जुन्नर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल देशमुख हे करीत आहेत.   

Website Title: Latest News Farmers beaten to death Sangamner taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here