संगमनेर: तरुणीचा पाठलाग करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील तिगाव येथील युवतीचा मोटारसायकलवर घुलेवाडी निमोण या भागात पाठलाग करणाऱ्या तरूणाविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुनील दगडू गायकवाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तिगाव येथील राहणाऱ्या तरुणीचे गेल्या काही दिवसांपूर्वी लग्न जमले आहे. तिचा होणारा पती तिचे कार्यालय पाहण्यासाठी तिच्यासोबत जात होता. याचवेळी तिगाव येथे राहणाऱ्या एका तरुणाने सदर मुलीचा पाठलाग केला. संतापलेल्या या युवतीने त्याला यासंदर्भात जाब विचारला. नंतर त्याच्याविरोधार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी सुनील दगडू गायकवाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल बाबा खेडकर करीत आहे.
Website Title: Latest News filed against a young man who chased a young woman