संगमनेर तालुक्यातील घटना: महिलांकडे पाहून लघुशंका, विळ्याने वार, गुन्हा दाखल
संगमनेर(News): संगमनेर तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबातील शेतकऱ्याची पत्नी व पुतणी शेतात घास कापत असताना आरोपीने महिलांकडे पाहून लघुशंका केली.
याचा जाब महिलेच्या मुलाने व शेतकऱ्याने विचारला असता त्यांच्यावरच आरोपीने धारदार विळ्याने पोटावर पाठीवर वार करून काठीने मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना काल सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास घडली.
याप्रकरणी आश्वी पोलिसांत नानासाहेब यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून आरोपी भिकाजी नामदेव सोनवणे, शरद भिकाजी सोनवणे, महेश शरद सोनवणे, पप्पू भिकाजी सोनवणे सर्व राहणार चेडगाव ता. संगमनेर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मांडगावकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास शेख हे करीत आहेत.
Website Title: News Sangamner Taluka Fighting filing a crime