Home संगमनेर संगमनेर: वडगाव पान येथे दोघांवर चाकूने हल्ला, एकाचा भोकसून खून

संगमनेर: वडगाव पान येथे दोघांवर चाकूने हल्ला, एकाचा भोकसून खून

संगमनेर: किरकोळ भांडणाच्या कारणावरून एका व्यक्तीने पिता पुत्रांवर खूनी हल्ला केला. यात ५५ वर्षीय व्यक्तीचा चाकुन भोकसून मृत्यू झाला तर दुसऱ्यावर चाकूचे वार केल्याने जबर जखमी झाला आहे. संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे काल सायंकाळी ही घटना घडली.

वडगाव पान येथील राहत असलेल्या दोन कुटुंबामध्ये रविवारी सायंकाळी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. दुसऱ्या तरुणास शिवीगाळ करून मारहाण केली. त्यामध्ये त्याचे डोके फुटले त्यानंतर हा वाद वाढत जाऊन काल सायंकाळी एका तरुणाने दुसऱ्या कुटुंबातील ५५ वर्षीय व्यक्तीवर व २५ वर्षीय मुलावर चाकू हल्ला केला.

यामध्ये ५५ वर्षीय व्यक्तीच्या अंगावर तरुणाने चाकू हल्ला करत सपासप वार केले. तर त्याच्या मुलावरही चाकूचे वार केले. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनेच्या दिशेने धाव घेतली. जखमींना संगमनेर येते उपचारसाठी हलविण्यात आले. यात ५५ वर्षीय बाळासाहेब माधव चत्तर सपासप वार झाल्याने त्यांचा अधिक रक्तस्त्राव वाहून त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान हल्ला करणारा तरुण हा फरार झाला आहे. या घटनेने मयत व्यक्तींच्या नातेवाईकानी हल्लेखोरांच्या घरावर हल्ला केला. त्यानंतर सदर नातेवाईक दवाखान्यात हजर झाले. यावेळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील उपस्थित होते.

राहुल काळे आरोपी हा घटनेनंतर फरार झाला असून त्याचे गावात अवैध व्यवसाय असल्याची माहिती  ग्रामस्थांच्या चर्चेतून समोर आली. या व्यक्तीचा गावात देखील ग्रामस्थांना त्रास होत असल्याची चर्चा होत होती.   

मयत चत्तर यांचा मुलगा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात राहुल देविदास काळे, देविदास हरिभाऊ काळे, राम गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Website Title: News Wadgaon Pan, two were stabbed and one was stabbed to death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here