Home अकोले अकोले: कल्याणहून समशेरपूर येथे आलेले पती पत्नी करोनाबाधित

अकोले: कल्याणहून समशेरपूर येथे आलेले पती पत्नी करोनाबाधित

अकोले: अकोले तालुक्यातील समशेरपूर येथे नागवाडी परिसरात कल्याणहून आलेले पती ५० वर्षीय, व  पत्नी ४२ वर्षीय करोनाबाधित आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

नागवडी येथे करोनाबाधित आढळून आलेल्या पती पत्नीचे मुले राहत आहे. तीन दिवसांपूर्वी हे पती पत्नी कल्याणहून नागवाडी येथे आले होते. मुंबई येथे कामास असलेल्या या पती पत्नीस मुबई येथे करोनाची लागण झाल्याचा अंदाज आहे. तीन दिवसांपूर्वी ते नागवाडी येथे आले असता कुटुंबीयांनी त्यांना अलग राहण्यास सांगितले होते.

सदर पती पत्नीस त्रास जाणवू लागल्याने त्यांना नाशिक येथे उपचारासाठी पाठविण्यात आले होते. नाशिक रुग्णालयात या पती पत्नीची करोनाची तपासणी करण्यात आली. या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. प्रशासनाने करोनाबाधित असलेला परिसर सील करण्यात आला आहे.

सदर पती पत्नी यांना करोनाची लागण ही मुंबई येथेच झाली असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे गावाशी यांचा संपर्क आलेला नाही. तरी नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासन करीत आहे.  

Website Title: coronavirus-samsherpur-akole-two-positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here