Home अकोले कोतूळमध्ये आणखी एक करोना पॉझिटिव्ह

कोतूळमध्ये आणखी एक करोना पॉझिटिव्ह

Coronavirus/अकोले: अकोले तालुक्यातील कोतूळ येथे मागील आठवड्यात एक रुग्ण आढळून आला होता. आता पुन्हा एकदा कोतूळ मध्ये एकाची भर पडली आहे.

अकोले तालुक्यातील काझी गल्ली, कोतुळ येथील ६५ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. कोतूळ हे सील केलेले असताना आणखी रुग्ण आढळून येणे ही प्रशासनासाठी डोकेदुखी ठरणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आज दोन नवे रुग्ण आढळून आले आहेत. यात कोतूळमधील एक तर नगर शहरातील वाघ गल्ली नालेगाव येथील ३८ वर्षीय महिला पॉझिटिव्ह आढळून आली आहे. हे दोनही रुग्ण मागील बाधित व्यक्तींच्या संपर्कातून यांना लागण झालेली आहे.   

तसेच आज जिल्ह्यातील चार जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यात संगमनेर, राहता, नगर शहरातील व शेवगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. 

Website Title: Coronavirus Kotul another one patient

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here