Home अहमदनगर आत्याच्या मुलानेच केला अल्पवयीन नऊ वर्षाच्या मुलीचा खून

आत्याच्या मुलानेच केला अल्पवयीन नऊ वर्षाच्या मुलीचा खून

नेवासा: नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथील नऊ अल्पवयीन मुलीचा खून केल्याची कबुली मयत मुलीच्या आत्याच्या मुलाने दिली असून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाने वेगळे वळण घेतल्याने धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे.

सौंदाळा येथील अल्पवयीन मुलीचा गळा दाबल्याने तिचा गुदमरून मृत्यू झाल्याचे शवविचेदन अहवालात निष्पन्न झाले होते. त्यानुसार सोमवारी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र सोमवारी चौकशी दरम्यान तिच्या आत्याच्या मुलगा अप्पासाहेब नानासाहेब थोरात यानेच तिचा खून केल्याची कबुली दिली आहे.

याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल भीमराव पवार यांनी फिर्याद दिली आहे या फिर्यादीत म्हंटले आहे की, ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा यांनी दिलेल्या माहितीवरून मयत ९ वर्षीय मुलीला उपचारासाठी रुग्णालयात आणले असता उपचारापूर्वीच ती मयत झाली.

सुरुवातीला नेवासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पंचनामा करतेवेळी तिच्या चुलत्यांनी तिला सर्पदंश झाल्याचे सांगितले. मात्र तपासणीत वैद्यकीय अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी मृतदेह शवविचेदन करण्यासाठी अहमदनगर येथे पाठविला. तेथील डॉक्टरांनी मुलीच्या श्वसन नलीकेवर कशाने तरी दबाव टाकून मृत्यू झाल्याचे सांगितले.या अहवालावरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशी दरम्यान सोमवारी सायंकाळी तिच्याच आत्याच्या मुलाने खून केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याला अटक करण्यात आली आहे.  

Website Title: News Atya’s son killed a minor nine-year-old girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here