Home अहमदनगर Crime: अल्पवयीन मुलीचा विनयभंग, दोघांवर गुन्हा दाखल

Crime: अल्पवयीन मुलीचा विनयभंग, दोघांवर गुन्हा दाखल

Crime Filed Molestation of a minor girl

श्रीरामपूर | Crime: श्रीरामपूर शहरात एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा दारूच्या नशेत असलेल्या दोघांनी लज्जास्पद वर्तन करत विनयभंग केल्याप्रकरणी दोघांविरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीतेच्या फिर्यादीवरून सागर कांबळे व संदीप कांबळे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हे दारूच्या नशेत पिडीतेच्या घरासमोर आले व तिला शिवीगाळ केली. कुटुंबियांना मारहाणीची धमकी दिली व लज्जास्पद वर्तन केले. याप्रकरणी पिडीत महिलेने गुरुवारी फिर्याद दिल्याने सागर कांबळे व संदीप कांबळे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास श्रीरामपूर पोलीस करीत आहे. 

Web Title: Crime Filed Molestation of a minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here