जितेंद्र आव्हाड यांच्यावर संगमनेरात गुन्हा दाखल
Breaking News | Sangamner: आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टर फाडले.
संगमनेर: महाड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टर फाडले. याबाबत संगमनेर शहर पोलिसांत आमदार आव्हाड यांच्यावर बुधवारी (दि. २९ मे) गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, की मानधन तत्वावर काम करणारे शिक्षक विकास साहेबराव जाधव यांना मित्राकडून समजले की एका वृत्तवाहिनीवर बातम्या बघत असताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथील चवदार तळ्यावर आंदोलन करत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टर फाडले आहे. या कृत्यामुळे वैयक्तिक भावना दुखावल्या आहेत. तसेच यामुळे शांततेचा भंग होण्याचीही शक्यता आहे.
याप्रकरणी विकास जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर भादंवि कलम ५०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.
Web Title: Crime has been registered against Jitendra Awad in Sangamner
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study