Home अहमदनगर Crime: भाच्याने मामाला अडकविण्यासाठी रचला बनाव, मात्र मामीने फोडले बिंग

Crime: भाच्याने मामाला अडकविण्यासाठी रचला बनाव, मात्र मामीने फोडले बिंग

Crime Make a plan for your niece to get involved

कर्जत | Crime: मामाकडून पैसे न मिळाल्यामुळे रागातून भाच्याने मामाविरुद्ध कट रचला अन तक्रार देण्यासाठी कर्जत पोलीस ठाणे गाठले. मात्र भाच्याचे बिंग मामीने उघडकीस आणले. मामा विरुद्ध रचलेला डाव अंगलट आल्याने भाच्याने धूम ठोकली. खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी भाच्यावरच कर्जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

सागर शंकर निंभोरे रा. घोडेगाव ता. श्रीगोंदा असे या बनाव रचणाऱ्या भाच्याचे नाव आहे. त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

श्रीगोंदा कर्जत रोडवर दूरगाव फाटा येथे दोन अज्ञात मोटारसायकल स्वरांनी सागर निंभोरे याला आडवून चाकूचा धाक दाखवत मारहाण करून त्याच्याजवळील १ लाख रुपये व मोबाईल चोरल्याची तक्रार सागर निंभोरे याने २७ मे रोजी कर्जत पोलिसांत दिली होती.

निंभोरे याने त्याचा मामा पोपट दरेकर यांनीच आपल्याला लुटले असल्याचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी घटनास्थळी भेट देऊन खात्री करण्यास व शोध घेण्यास कर्मचारीवर्ग यांना पाठविले होते.

पोलिसांनी चौकशी करत गोपनीय माहिती मिळविली असता २७ मे रोजी निंभोरे आणि घोडेगाव येथील काही लोकांचा वाद झाला होता असे समजले. त्यानंतर पोलिसांनी निंभोरे याला घोडेगाव ता, श्रीगोंदा येथे नेले. निंभोरे याचे मामा पोपट दरेकर व त्यांचा मुलगा दीपक यांच्याबरोबर निंभोरे याचा वाद झाल्याचे पोलिसांना समजले. निंभोरे यास पोपट दरेकर यांच्या घरी घेऊन पोलीस गेले असता त्याची मामी नंदाबाई दरेकर यांनी निंभोरे याचे बिंग फोडले.

निंभोरे याने पोपट दरेकर यांचा मतीमंद मुलगा दीपक यास मारहाण केली. निंभोरे याचा मोबाईल दीपक दरेकर याने चोरल्याचा कांगावा करीत घराची झडती घेतली. असे सांगत नंदाबाई दरेकर यांनी दीपक यास निंभोरे याने मारहाण केल्याची जखम दाखवली. आपला भांडाफोड झाल्याचे लक्षात येताच सागर निंभोरे याने तेथून धूम ठोकली. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात सागर निंभोरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Crime Make a plan for your niece to get involved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here