Home क्राईम संगमनेरात कर्जदारांच्या पैशाचा अपहार, बँकेची फसवणूक

संगमनेरात कर्जदारांच्या पैशाचा अपहार, बँकेची फसवणूक

Embezzlement of borrowers' money in Sangamner

संगमनेर | Sangamner: कर्जदारांच्या १ लाख ५४ हजार रुपये रकमेचा अपहार करून बँकेची फसवणूक केल्याने इक्विटास स्माल फायनान्स या बँकेच्या उपशाखा अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, इक्विटास स्माल फायनान्स या बँकेचा उपशाखा अधिकारी राहुल बाळासाहेब गोडसे याने कर्जदारांकडून १ लाख ५४ हजार रुपयाची रक्कम वसूल केली होती. त्याने सदर रक्कम बँकेत भरण्याऐवजी स्वतः साठी वापरली. सदर रक्कम बँकेत भरण्यासाठी त्याला सांगण्यात आले होते. मात्र त्याने ही रक्कम बँकेत न भरल्याने बँकेचे शाखाधिकारी प्रदीप मेहता यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून पोलिसानी राहुल गोडसे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.  

Web Title: Embezzlement of borrowers’ money in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here