Home अहमदनगर भाजी विक्रेता तीन दिवसांपासून घरातून बेपत्ता होता, तपास केला तेव्हा समजले की

भाजी विक्रेता तीन दिवसांपासून घरातून बेपत्ता होता, तपास केला तेव्हा समजले की

Ahmednagar missing from the house for three days

अहमदनगर | Ahmednagar: श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरजवळ नदीपात्रता एका जणाचा मृतदेह आढळून आल्याने पोलिसांनी चौकशी केली असता तो पढेगाव येथील भाजी विक्रेता शंकर उत्तम गलांडे वय ३१ असल्याची माहिती समजली.  भाजींच्या पिशव्यांसह त्याची दुचाकी परिसरात आढळून आली असून गेल्या ३ दिवसांपासून तो घरी आला नव्हता असे कुटुंबीयांनी सांगितले. त्याने आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

बेलापूर येथील प्रवरा नदीच्या पुलावर एक दुचाकी उभी असल्याचे आढळून आले. नदीपात्रात एक मृतदेह तरंगत असल्याचे नागरिकांना दिसून आले. ही माहिती नागरिकांनी पोलिसांना कळविली. पोलिसांनी चौकशी केली असता दुचाकी व मृतदेह यांचा काहीतरी संबंध असल्याचा संशय आला त्यावरून दुचाकीची तपासणी केली. दुचाकीला भाजीच्या पिशव्या अडकविलेल्या होत्या. भाजी खराब झाली होती.

गाडी क्रमांक एमएच १७ ए. ५१९८ या दुचाकीच्या अनुषंगाने तपास सुरू केला असता  दुचाकीला अडकविलेल्या पिशवीत एक डायरी होती. त्यावर शंकर उत्तम गलांडे असे नाव होते. त्याच नावाच्या व्यक्तीचे ओळखपत्रही होते. याशिवाय काही फोन नंबर लिहिले होते. पोलिसांनी त्यावर संपर्क करून विचारपूस सुरू केली. त्यातून त्याच्या घरच्या लोकांशी संपर्क केला. त्यांनी शंकर गलांडे भाजी विक्रेता असून तीन दिवसांपासून घरी आला नसल्याचे सांगितले.  त्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक अंदाज आहे. मात्र कोणतेही चिठी आढळून आली नाही. त्यांनी नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजलेले नाही.

Web Title: Ahmednagar missing from the house for three days

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here