Home अहमदनगर चोर समजून झालेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू, तिघांना अटक

चोर समजून झालेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू, तिघांना अटक

Kopargaon Death of a youth in a beating

कोपरगाव | Kopargaon: चोर समजून मारहाणीत जखमी झालेल्या परप्रांतीयाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी तिघांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.

शिंगणापूर शिवारात असलेल्या २८ चारी रोड येथे पश्चिम बंगाल येथील वासुदेव तुफान मार्डी वय ४० यास चोर समजून त्याच गावातील मच्छिंद्र संवत्सकर, अमोल संवत्सकर, बापू संवत्सकर व सुरेश दादरे यांनी काठी व फावड्याने मारहाण करून जखमी केले. यातच उपचार सुरु असताना मृत्यू झाला. याप्रकरणी कोपरगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. याप्रकरणाचा अधिक तपास करताना पोलिसांच्या हाती आलेल्या माहितीनुसार मयत हा ३ जून रोजी पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास २८ चारी परिसरात संशयास्पद फिरत असताना आरोपींनी त्यास चोर समजून त्याच्या हातातील काठ्या व फावड्याने त्यास मारहाण करून गंभीर दुखापत केली. त्यानंतर त्यास नागरिकांनी कोपरगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र त्याचे ४ जून रोजी निधन झाले. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली. कोपरगाव येथील न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे.   

Web Title: Kopargaon Death of a youth in a beating

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here