Home अकोले अकोले तालुक्यात कपडे विकायला आल्याच्या बहाण्याने घरात घुसून मुलीचा विनयभंग

अकोले तालुक्यात कपडे विकायला आल्याच्या बहाण्याने घरात घुसून मुलीचा विनयभंग

Crime News Akole house under the pretext of selling clothes and molested the girl  

अकोले | Crime News: अकोले तालुक्यातील वीरगाव येथे कपडे विकण्याचे बहाण्याने घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सावेज भुरा कुरेशी व असिफ वकील कुरेशी रा. शिक्रापूर ता. शहापूर जि. ठाणे हल्ली रा. संगमनेर यांच्याविरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अकोले पोलीस ठाण्यात ४० वर्षीय महिलेने फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीत म्हंटले आहे की, फिर्यादीची १२ वर्षीय अल्पवयीन पुतणी ८ जुलै गुरुवारी साडे नऊ वाजता घरात एकटी असताना सावेज भुरा कुरेशी, असिफ वकील कुरेशी हे कपडे विकण्याच्या बहाण्याने घरी येऊन असिफ कुरेशी हा घराबाहेर थांबत व सावेज भुरा कुरेशी हा घरामध्ये घुसून अल्पवयीन पुतणी हिला फुकट कपडे देतो असे म्हणात तिचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला. व असिफ कुरेशी याने त्यास साथ दिली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. यावरून अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मिथुन घुगे हे करीत आहे.

Web Title: Crime News Akole house under the pretext of selling clothes and molested the girl  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here