Home अहमदनगर साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्याची संगमनेर तालुक्यात आत्महत्या

साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्याची संगमनेर तालुक्यात आत्महत्या

Saibaba Sansthan employee commits suicide in Sangamner

शिर्डी | Suicide: शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या भोजनालयातील आचारी दिलीप बाबासाहेब सांबारे वय २५ रा. कणकुरी रोड शिर्डी यांचा संगमनेर तालुक्यात बाभळीच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

संगमनेर तालुक्यातील कौठे कमलेश्वर गावातील निळवंडे शिवारात दिलीप सांबारे यांचा मृतदेह बाभळीच्या झाडाला दोरीच्या सहायाने गळफास घेतलेल्या अवस्थेत आल्याचे शुक्रवारी ९ जुलै रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.

मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने मृतदेहाची माहिती पोलीस पाटील अशोक कोल्हे यांनी संगमनेर तालुका पोलिसांना दिली.

त्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल विष्णू आहेर यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह संगमनेर ग्रामीण रुग्णालयात उत्तरणीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.  अधिक तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Web Title: Saibaba Sansthan employee commits suicide in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here