Home अहमदनगर Ahmednagar News: शेततळ्यात पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

Ahmednagar News: शेततळ्यात पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

Ahmednagar news young farmer dies after falling into a field

राहता | Ahmednagar News: राहता तालुक्यातील रुई येथील एक तरुण शेतकरी शेततळ्याच्या कडेला चपला सोडून बसलेला असताना त्याचा तोल गेल्याने शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. निलेश हिमंतराव कडू असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने रुई परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हिंमंतराव पतंगराव कडू यांच्या मालकीच्या शेतावर शेततळे बांधले आहे. त्या शेततळ्यात तरुण शेतकऱ्याचा आकस्मिक मृत्यू झाल्याने रुई गावात शोककळा पसरली आहे. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी राहता प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे. शिर्डी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास शिर्डी पोलीस करीत आहे.

Web Title: Ahmednagar news young farmer dies after falling into a field

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here