Home क्राईम संगमनेर: शेतात तणनाशक फवारण्याच्या वादातून एकमेकांना मारहाण

संगमनेर: शेतात तणनाशक फवारण्याच्या वादातून एकमेकांना मारहाण

Crime News Beat each other over a dispute over spraying herbicides 

संगमनेर | Crime News: संगमनेर तालुक्यातील पठारभागातील शिंदोडी येथे शेतात तणनाशके फवारणी करण्याच्या वादातून एकमेकांना मारहाण करण्याची घटना सोमवारी सकाळी साडे बारा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात दोन परस्परविरोधी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयश्री विठ्ठल नाईकवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून द्वारका शिवराम घुले, तानाजी पंढरीनाथ घुले, शिवाजी पंढरीनाथ घुले व शिवाजी यांचा मुलगा सर्व रा. सावरगाव घुले ता. संगमनेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी फिर्याद द्वारका शिवराम घुले रा. सावरगाव घुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जनाबाई सिताराम नाईकवाडी, जया विठ्ठल नाईकवाडी, बाळू विठोबा नाईकवाडी, सोपान लहानू नाईकवाडी, सर्व रा. शिंदोडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Crime News Beat each other over a dispute over spraying herbicides 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here