Home महाराष्ट्र महानायक दिग्गज अभिनेते दिलीपकुमार यांचे निधन

महानायक दिग्गज अभिनेते दिलीपकुमार यांचे निधन

Actor Dilip Kumar passes away

मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते मोहम्मद युसुफ खान उर्फ दिलीपकुमार (Dilip Kumar) यांचे ९८ व्या वर्षी निधन झाले आहे. दिलीपकुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना मुंबई येथील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

काही दिवसांपूर्वी दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचे चाहते व संपूर्ण बॉलीवूड त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते. पण आज अखेर त्यांनी पहाटे अखेरचा श्वास घेतला आहे.  चित्रपटसृष्टीतील दिग्गज महानायक आज हरपला आहे. यामुळे चित्रपटसृष्टीत व चाहते यांच्यात शोककळा पसरली आहे.

Web Title: Actor Dilip Kumar passes away

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here