Home क्राईम संगमनेर: गाडी खरेदी करण्यासाठी विवाहितेचा  छळ

संगमनेर: गाडी खरेदी करण्यासाठी विवाहितेचा  छळ

Crime News Harassment of a married woman to buy a car

संगमनेर | Crime News: गाडी खरेदी करण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणावेत यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या एकूण सात जणांविरोधात घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरिदास चांगदेव जाधव (पती ), चांगदेव नामदेव जाधव (सासरा), गया चांगदेव जाधव (सासू), अमोल चांगदेव जाधव (दीर) सर्व रा. मांडवे खुर्द ता. पारनेर, सिताराम नामदेव जाधव (चुलत सासरा ), सुषमा सिताराम जाधव (चुलत सासू ), सीमा सिताराम जाधव (चुलत नणंद रा. नारायणगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, गाडी खरेदी करण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणावेत यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळास कंटाळून विवाहितेने घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यावरून पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Crime News Harassment of a married woman to buy a car 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here