Home अहमदनगर Crime News: बालकल्याण समितीच्या अध्यक्षांना मारहाण

Crime News: बालकल्याण समितीच्या अध्यक्षांना मारहाण

Crime News Beating the chairman of the child welfare committee

अहमदनगर | Crime News: अहमदनगर येथील बालकल्याण समितीच्या कार्यालयात १०० ते १२ जणांनी प्रवेश करत अध्यक्ष यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. अध्यक्ष हनिफ मेहबुब शेख (वय ४४ रा. मुकुंदनगर) यांना मारहाण करून इतर  सदस्यांवर शाई फेकण्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी हनिफ मेहबुब शेख यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कर्जत तालुक्यातील बारडगाव दगडी येथील आदिवासी युग प्रवर्तक सामाजिक विकास प्रतिष्ठानाचे अध्यक्ष ईश्‍वर काळे, त्याची पत्नी, सून व त्यांच्या सोबतचे १०  ते १२ यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

 ईश्‍वर काळे याच्या युग प्रवर्तक प्रतिष्ठान संचलित यशोधरा मुला-मुलींचे वसतिगृह बारडगाव दगडी येथे आहे. त्याठिकाणी १०  मुले अनाधिकाराने ठेवण्यात आली आहे. त्या वसतिगृहाला कुठलीच मान्यता नसल्याचा अहवाल देण्यात आला आहे. याप्रकरणी काळे हा इतर साथीदारांना घेऊन सोमवारी बालकल्याण समिती येथे आला.

त्याने फिर्यादी व त्यांच्या इतर सहकार्‍यांना शिवीगाळ करून निळ्या रंगाची शाई फेकली. तसेच त्याच्या पत्नीने फिर्यादी यांना मारहाण केली. तुम्ही आमच्या विरोधात कोणतीही कारवाई करू नका व केलेली कारवाई मागे घ्या, नाही तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. तसेच कार्यालयातील कागदपत्रे, फाईल फेकून देत तोडफोड केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास  पोलीस हवालदार बोरूडे करीत आहे.

Web Title: Crime News Beating the chairman of the child welfare committee

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here