Home क्राईम संगमनेर: अल्पवयीन मुलीचे फोटो का काढले अशी विचारणा केल्याच्या रागातून कुटुंबीयास मारहाण

संगमनेर: अल्पवयीन मुलीचे फोटो का काढले अशी विचारणा केल्याच्या रागातून कुटुंबीयास मारहाण

Crime News Family members beaten up after asking why a photo of a minor girl was taken

संगमनेर | Crime News: अल्पवयीन मुलीचे फोटो का काढले अशी विचारणा केल्याच्या रागातून कुटुंबीयास मारहाण केल्याची घटना संगमनेर तालुक्यात तिगाव येथे घडली आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात एका जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संगमनेर तालुक्यातील तिगाव गावात अल्पवयीन मुलीचे फोटो का काढले अशी विचारणा करणाऱ्या कुटुंबीयास बेदम मारहाण करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. तालुक्यातील एका गावातील एका १४ वर्षीय अल्पवयीन शेतात काम करीत असणाऱ्या आपल्या आईसाठी पाण्याची कळशी घेऊन जात होती. दरम्यान एका व्यक्तीने त्या मुलीकडे बघत अश्लील हावभाव केले तसेच तिचे फोटोही काढले. मुलीने हा प्रकार शेतात गेल्यावर आपल्या आईला सांगितला असता आईने मुलीचे फोटो का काढले अशी विचारणा आरोपीला केली मात्र त्याने काही एक उत्तर न देता संध्याकाळी फिर्यादी महिलेचा पती घरी आल्यानंतर महिलेने मुली संदर्भातील घटना पतीस सांगितली त्यामुळे पतीने याची विचारणा करण्याचा प्रयत्न सदर आरोपीकडे केला मात्र आरोपीने शिविगाळ करीत हातातील गजाने फिर्यादी महिलेच्या पतीला बेदम मारहाण केली. त्यांना सोडविण्यास गेलेल्या फिर्यादी महिलेस व मुलास मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले.

याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात भास्कर कारभारी गायकवाड याच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहे.  

Web Title: Crime News Family members beaten up after asking why a photo of a minor girl was taken

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here