Home अहमदनगर अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी पकडला

अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी पकडला

Crime News Police caught a truck transporting illegal sand

कर्जत | Crime News: अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक कर्जत तालुक्यातील मांदळी येथे पकडला असून कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, मिरजगावकडून मांदळीच्या दिशेने एक ट्रक अवैध वाळू चोरून बेकायदेशीररित्या वाहतूक करत आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी सापळा लावून मांदळी बस थांब्याजवळ सदरील निळ्या रंगाचा ट्रक अडवला. ट्रक ड्रायव्हर किरण नेमीचंद वाळुंजकर, राहणार कानडी बुद्रुक, तालुका आष्टी, जिल्हा बीड याला ताब्यात घेतले. वाळू वाहतूक करणारा ट्रक व वाळू असा 3 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वाळू वाहतूक करण्याचा कुठलाही परवाना नसताना तो वाळू वाहतूक करत होता.

पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिलीप खैरे यांच्या फिर्यादीवरून वाळू तस्करी करणारा किरण नेमीचंद वाळुंजकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.  

Web Title: Crime News Police caught a truck transporting illegal sand

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here