Home क्राईम Crime News: संगमनेरात महिलेचा विनयभंग, गुन्हा दाखल

Crime News: संगमनेरात महिलेचा विनयभंग, गुन्हा दाखल

Crime News Molestation of a woman in Sangamner

संगमनेर | crime News: संगमनेर शहरात एका महिलेला नवीन नगर रोड परिसरात अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एका जणावर गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील मालदाड रोड परिसरात राहणाऱ्या १० वर्षीय अविवाहित महिलेने याबाबत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तुषार संपत वामन याने सदर महिलेला मोबाईलवर फोन करून तु मला फार आवडतेस. माझे तुझ्यावर प्रेम आहे. असे म्हणून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याबाबत सदर महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून तुषार वामन याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक फौजदार आर.एन.शेख करीत आहे.

Web Title: Crime News Molestation of a woman in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here