Home Uncategorized संगमनेरात दोन गटांत लोखंडी रॉड, दांडक्याने तुंबळ हाणामारी

संगमनेरात दोन गटांत लोखंडी रॉड, दांडक्याने तुंबळ हाणामारी

Crime News Sangamner two groups fought with iron rods and sticks

संगमनेर | Crime News: शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास शहरातील इस्लामपुरा नाटकी चौक येथे मोठमोठ्याने आरडाओरडा करत वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करत असताना त्यांना समजावून सांगण्यासाठी फिर्यादी गेले असता दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत लाकडी दांडके, लोखंडी रॉडचा वापर करून एकमेकांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत दोन्ही गटातील ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी अमजद दाउद सय्यद रा. इस्लामपुरा याचा मुलगा सोहेल व त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार रात्री साडे अकरा वाजता हुसेन बागवान वाढदिवस मोठमोठ्याने आरडाओरडा करत साजरा करत होते. यावेळी फिर्यादी अमजद सय्यद व इमाम दाउद सय्यद हे त्यांना समजावून सांगण्यासाठी गेले असता आरोपी जमीर शेख, अजीज शेख, फिजान समीर शेख, अदनान समीर शेख, निसार अमजद शेख, मुन्ना शेख, गुड्डू निसार शेख, असीम शेख अरबाज शेख, हुसेन बागवान, तस्लीम शेख, बब्बू शेख यांनी फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकाला लोखंडी रॉड, लाकडी दांडके यांच्या सहायाने फिर्यादी व त्याचा भाऊ एजाज शेख यांच्या डोक्यात लाकडी रॉड मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच इतरांना देखील बेदम मारहाण केली. या हाणामारीत फिर्यादी अमजद सय्यद, इमाम सय्यद, सोहेल सय्यद, हे जखमी झाले असून कुटे हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत. याप्रकरणी ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी फिर्याद हुसेन एजाज बागवान याने फिर्याद दिली. फिर्यादी हुसेन बागबान यांच्या वाढदिवस निमित्त लोकसेवा गरेज समोर साडे अकरा वाजेच्या सुमारास केक कापत असताना आरोपी साहिल अमजद सय्यद, मजाज दाउद सय्यद, अमजद दाउद सय्यद व इतर यांनी संगनमत करून फिर्यादी व इतर यांना तुम्ही येथे वाढदिवस कशाला साजरा करता आरडाओरडा का करता असे म्हणत फिर्यादी व साथीदार लाथाबुक्क्यांनी ,व फळीने मारहाण केली.याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Crime News Sangamner two groups fought with iron rods and sticks

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here