Home अकोले अकोले तालुक्यातील सरपंच व ग्रामसेविका विरोधात गुन्हा दाखल

अकोले तालुक्यातील सरपंच व ग्रामसेविका विरोधात गुन्हा दाखल

 

Crime News Sarpanch and Gramsevika of Akole taluka

अकोले | Crime News: शेणीत ग्रामपंचायतच्या तत्कालीन सरपंच सत्यभामा जाधव, तत्कालीन ग्रामसेविका अरुणा गंभिरे यांनी १ एप्रिल २०१८ ते २७ डिसेंबर २०१९ या कालावधीत ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधी, १४ वा वित्त आयोग आणि पाणीपुरवठा या खात्यामधील एकूण १ लाख ८० हजार २५८ रुपयांचा नियमबाह्य खर्च केल्याचे उघडकीस आले आहे.

यामध्ये झालेल्या कामांचे मुल्यांकन व पूर्णत्वाचा दाखला न घेताच पूर्ण न केलेले व्यवहार, ग्रामपंचायत घरपट्टी, ग्रामनिधी खात्यात वर्ग न करता खर्च करणे, व इतर नियमबाह्य खर्चाबाबत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गणपत धांडे यांनी राजूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

विस्तार अधिकारी गणपत धांडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून तत्कालीन सरपंच सत्यभामा जाधव, तत्कालीन ग्रामसेविका अरुणा गंभिरे यांच्यावर राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार हे करीत आहे.

Web Title: Crime News Sarpanch and Gramsevika of Akole taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here